हैदराबाद निजामांची तब्बल ३३२ कोटी रुपयांची मालमत्ता 'यांना' मिळणार!माय अहमदनगर वेब टीम
लंडन - जवळपास सात दशकांपासून लंडनच्या बँकेत लटकलेला निजामाचा पैसा आता सातवे निजाम मीर उस्‍मान अली खान यांचे नातू मुकर्रम जाह, मुफ्फखम जाह आणि भारत सरकारला मिळणार आहे. लंडनच्या हायकोर्टाने आज (बुधवार) हैदराबाद रियासतच्या बाकी दावेदारांचा दावा रद्दबातल केला. एकुण ३३२ कोटी रूपयांच्या संपत्‍तीची वाटणी व्हायची आहे. ज्‍याचा खटला अनेक वर्षांपासून सुरू आहे.

अखेर निजामाचे नातू नजफ अली खान समवेत एकूण १२० पेक्षा अधिक लोकांनी त्‍यांच्या हक्‍काचा पैसा त्‍यांना मिळत नसल्याचा दावा केला होता.  या लोकांनी तक्रार केली होती. त्‍यानुसार भारत सरकार आणि निजामाच्या बाकी दोन्ही नातवांमध्ये पैसा वाटण्याचा गुप्त करार झाला आहे. या दाव्याला लंडन हायकोर्टाने रद्दबातल ठरवले. मागच्या वर्षी पाकिस्‍तानकडून या पैशांवर करण्यात आलेला दावाही कोर्टाने रद्दबातल केला होता. तसेच निजामाच्या दोन वंशजांसोबतचं भारत सरकारलाही याचे भागीदार मानले होते.

निजाम फॅमिली वेलफेअर असोसिएशनचे नेतृत्‍व करत असलेल्‍या नजफ अली खान यांनी देखील या पैशांवर आपला दावा दाखल केला होता. लंडन हायकोर्टाच्या निर्णयानंतर त्‍यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्‍यामध्ये त्‍यांनी मला आणि ११६ वंशजांना भारत सरकार आणि निजामाच्या दोन्ही वंशजांमध्ये हा पैसा कोणत्‍या आधारावर वाटण्यात आला, हे समजले नाही. न्यायाधिशांनी या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करावा असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post