पायांची निगा कशी राखाल ? मग हे नक्की वाचा


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - आपले हात-पाय कधीही काम करणे थांबवत नाहीत. पावसाळ्यात पायांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यातील दमट वातावरण, बदलेले हवामान तसेच ओलाव्यामुळे पायाचे विकार जडतात. दुर्गंधीयुक्त तळवे, नखांभोवती साचलेली घाण, ओलाव्याने पायांमधील खाचांमध्ये होणारे बुरशीजन्य संसर्ग या सार्‍यांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. 
याकरिता खालील काही टिप्स वापरून तुम्ही पावसाळ्यातील तुमच्या पायांच्या समस्यांना नक्कीच दूर ठेवू शकता.

रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्याच्या डबक्यात उड्या मारू नका. या पाण्यात असंख्य विषाणू असतात जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. मात्र, त्यामुळे पायाला बुरशीचा संसर्ग होऊ शकतो.
आपले पाय नेहमी कोरडे ठेवा. पावसाळ्यात बाहेरून आल्यानंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवून ते कोरडे करणे अधिक गरजेचे आहे. पाय सतत ओले राहिल्याने पायाच्या बेचक्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता असते.


 
अनवाणी पायाने चालू नका. थंड जमिनीवर अथवा पावसाळ्यातील ओल्या गवतावर अनवाणी पायांनी फिरणे टाळावे. यामुळे पायांना जंतूसंसर्ग आणि बुरशीजन्य संसर्गाची लागण होण्याची दाट शक्यता असते.
आपले पाय खुप वेळ पावसाच्या पाण्यात राहिल्यास कोमट पाण्यात थोडेसे जंतूनाशक द्रव्य घालून त्यात आपले पाय साधारण 10 मिनिटे बुडवून ठेवा आणि त्यानंतर पाय धुवून ते कोरडे करून घ्या.
पायांकरिता बुरशीनाशक पावडरचा वापर करा. पायात मोजे घालण्यापूर्वी पाय स्वच्छ कोरडे करून घ्या.

पायांकरिता चांगल्या क्रिमची निवड करून दररोज मॉईश्चराईज करा. सकाळी अंघोळीनंतर व रात्री झोपण्यापूर्वी या क्रिम्सचा वापर करावा.  त्यामुळे एलर्जीपासून दूर राहणे शक्य होईल तसेच पायांचे सौंदर्य टिकविता येईल. नसेल तर दररोज रात्री झोपताना पायांना तेलाने मालिश करून घ्यावी.
पायाची नखं वेळोवेळी कापावीत. वाढलेल्या नखांमध्ये घाण जाऊन संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे पायाची नखं जास्त न वाढविता ती वेळीच कापणे गरजेचे आहे.

चांगल्या प्रतीच्या पादत्राणांची निवड करावी. ती नेहमी कोरडी ठेवावीत. सर्वच बाजूंनी बंद असणार्‍या पादत्राणांची निवड करू नका. पावसाळ्यात गमबूट वापरणे उत्तम ठरेल. त्यामुळे साचलेल्या घाण पाण्यापासून पायांचे संरक्षण करता येईल. 

पायाला एखादी जखम झाली असल्यात ती झाकून ठेवा. घाण पाणी, माती या जखमेमध्ये शिरणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post