'मुख्यमंत्री ठाकरेंचे सरकारवर नियंत्रण नाही, रिमोटही दुसऱ्याच्या हातात'माय अहमदनगर वेब टीम
संगमनेर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दबावात काम करीत असून कोणताही निर्णय ते स्वत: घेत नाहीत. त्यांचे सरकारवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही. सरकारमध्ये फक्त संशय कल्लोळ सुरू असून सरकारचा रिमोटही दुसऱ्याच्या हातात आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेते आणि माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. किर्तनकार इंदोरीकर महाराजांची भेट घेतल्यानंतर आ. विखे पाटील यांनी माध्यभांशी संवाद साधला.

आ.विखे-पाटील म्हणाले, सरकारमध्ये कोणताही समन्वय नसून अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारमधील मंत्री फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपले अपयश झाकत आहेत, असा आरोप केला.

कोरोना संकटातही राज्य सरकारकडून पाहिजे तशी निर्णय प्रक्रियेची अंमलबजावणी होवू शकली नाही. सरकारचे अपयश कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून दिसून येत आहे. या कोरोना संख्येमुळेच महाराष्ट्र सध्या प्रथम क्रमांकावर दिसतो. हे राज्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे, असेही मत विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post