कोरोनामुळे देशात एकूण ३२,७७१ मृत्यूमाय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसांपासून देशभरात सरासरी 45 हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. देशातील आजपर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्यादेखील 32,771 झाली आहे.  देशात दिवसात पुन्हा 49 हजार 931 कोरोनाबाधित आढळले असून, हा आकडा 50 हजारांच्या घरात आहे. गत आठवड्यात तब्बल 2 लाख 8 हजार 154 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 5 हजार 247 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळपर्यंत देशात 49 हजार 931 कोरोनाबाधित आढळले. तर 708 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 24  तासांत तब्बल 31 हजार 991 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयांतून डिस्चार्ज दिला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14 लाख 35 हजार 453 एवढी झाली आहे. यातील 9 लाख 17 हजार 568 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4 लाख 85 हजार 114 रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 32 हजार 771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी देशातील कोरोनामुक्तीचा दर 63.92 टक्के एवढा झाला आहे.देशातील कोरोनामुक्ती तसेच मृत्यूचे प्रमाण हे अनुक्रमे 96.55 टक्के तसेच 3.45 टक्के एवढे आहे.

सर्वाधिक कोरोना प्रभावित महाराष्ट्रात दिवसभरात 9 हजार 431 कोरोनाबाधितांची भर पडली. महाराष्ट्रापाठोपाठ आंध्र प्रदेश (7,627), तामिळनाडू (6,986), कर्नाटक (5,199), उत्तर प्रदेश (3,246) तसेच बिहारमध्ये (2,572) कोरोना रुग्णांची लक्षणीय वाढ झाली. या राज्यांपाठोपाठ पश्चिम बंगाल (2,341), आसाम (1,142), ओडिशा (1,376), दिल्ली (1,075), गुजरात (1,196) तसेच तेलंगणात (1,593) मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्तांची भर पडली. देशातील मृत्यू दरात सातत्याने घट होत असून, सोमवारी सकाळी हा दर 2.28 टक्के नोंद झाला आहे. रविवारी तब्बल 5 लाख 15 हजार 472 नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post