आनंदाची बातमी आता भंडारदरा....


माय अहमदनगर वेब टीम
भंडारदरा - नगर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात सलग तिसर्‍या दिवशीही पावसाचे प्रमाण टिकून आहे. त्यामुळे नवीन पाण्याची आवक होत असल्याने दोन दिवसांत हे धरण निम्मे भरण्याची शक्यता वाढली आहे.

11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सकाळी पाणीसाठा 5188 दलघफू होता. त्यात वाढ होत असून सायंकाळी तो 5241 दलघफू झाला होता. पावसाच्या सरी अधून मधून कोसळत असल्याने हे धरण निम्मे होण्याची शक्यता आहे.

निळवंडे धरणातील पाणीसाठा 53 टक्के झाला आहे. पाऊस सुरू असल्याने पाणलोटात भात आवण्यांना वेग आला आहे. सर्वत्र हिवरेगार अधूनमधून वाहणारे धबधबे, खळखळणारे ओढे नाले यामुळे भंडारदरा परिसरातील सौंदर्य बहरले असून अजूनही लॉकडाऊन असल्याने पर्यटकांविना हा परिसर सुनासुना आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post