कोरोना चाचणीसाठी 50 हजार किट मिळणार
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढणार आहे. सध्या असलेली प्रतिदिन ३०० चाचण्यांची क्षमता आता प्रतिदिन १ हजार अशी होणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे एक्स्ट्रॅक्टर उपलब्ध झाले असून सोमवारपासून अधिक चाचण्या होऊ शकणार आहेत. याशिवाय, जिल्ह्यासाठी ५० हजार अँटीजेन किटसची मागणी नोंदविण्यात आली आहे. ते लवकरच प्राप्त होत असून मोठ्या प्रमाणात चाचण्या घेता येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १३०२ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २७८८ इतकी झाली आहे. आज ५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४३६ इतकी झाली आहे
Post a Comment