नगर जिल्ह्यात १८३ कोरोना रुग्ण


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे 183 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.  रुग्णसंख्येचा हा आजपर्यंतचा उच्चांक आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 27 वर पोचली आहे. त्यातील 1 हजार 133 रुग्ण बरे झाले, तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 854 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात सकाळच्या सत्रात दहा नवे रुग्ण आढळून आले. त्यात नेवासे 4 (सलाबतपूर 4), कर्जत 1 (शहर), शेवगाव -1 (वडगाव), नगर शहर 2,  संगमनेर 1 (घुलेवाडी) आणि नगर ग्रामीण 1 (रुईछत्तीशी) येथील रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत मात्र 173 बाधित आढळून आले.

त्याच बरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील निकट सहवासितांची जलद गतीने तपासणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने   गेल्या 3-4 दिवसांपासून जिल्ह्यात अँटीजेन चाचण्या सुरू केल्या आहेत. आतापर्यंत 1095 चाचण्या घेण्यात आल्या असून, त्यात 158 जण बाधित आढळले आहेत. त्याचीही नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 854 एवढी झाली आहे.

बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेचा वेग वाढावा यासाठी तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणेला अँटीजेन किटचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासे, पाथर्डी, कोपरगाव, संगमनेर, कॅन्टोन्मेंट आणि महानगरपालिका आरोग्य यंत्रणेला या अँटीजेन किटचे वितरण करण्यात आले आहे.

111 रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात काल 111 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यामध्ये नगर ग्रामीण 1, नगर शहर 37, नेवासे 5, पारनेर 3, राहाता 4, पाथर्डी 14, कॅन्टोन्मेंट 2, राहुरी 4, संगमनेर 32, श्रीगोंदा 1, अकोले 7 आणि कर्जत येथील 1 रुग्ण बरा झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post