पावसाळ्यात केस व त्वचा कोरडी का ठेवावी?
माय अहमदनगर वेब टीम
पावसाळ्याच्या दिवसात डोक्यावरील केस व त्वचा अत्यंत नाजूक बनते. भिजून आल्यावर आपली त्वचा आणि डोके कोरडे न केल्यास बुरशीच्या वाढीला प्रोत्साहन मिळते. ज्यांना कोंडा होण्याची सवय आहे, अशा व्यक्तींना केसांमध्ये खाज सुटते, बारीक संसर्गजन्य पुरळ येते. त्यातून रक्त येते.
केस प्रचंड प्रमाणात गळू लागतात. याकरिता केस/ डोके सतत कोरडे ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच हवेतील आर्द्रतेमुळे आणि त्यामुळे येणार्या सततच्या घामामुळे विषाणूंचा संसर्ग वाढतो. गुडघ्याच्या मागे, पायाच्या बोटांमध्ये याची वाढ सर्वांत जास्त प्रमाणात चिखल्या होतात. या त्वचाविकारात दोन बोटांच्या मध्ये खाज येते, त्वचा लाल होते, काही वेळा त्वचा फाटल्यासारखीसुद्धा होते.
Post a Comment