तुरटीचे औषधी फायदे


माय अहमदनगर वेब टीम
दररोज सकाळ-संध्याकाळ गरम पाण्यात तुरटी फिरवा व त्या पाण्याने चूळ भरा. असं नियमित केल्यामुळे दातांची कीड नाहीशी होऊन मुख दुर्गंधीचा त्रासही नाहीसा होतो. खूप घाम येणार्‍या व्यक्तींनी अंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवावी व त्या पाण्याने अंघोळ करावी. यामुळे घाम येण्याचं प्रमाण कमी होतं.

जखम झाल्यास व त्यातून रक्त येत असल्यास जखम तुरटीच्या पाण्याने स्वच्छ करा. दात दुखत असल्यास तुरटी आणि काळे मिरे एकत्र करून दातांच्या मुळाशी चोळावे, यामुळे दातदुखी थांबते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post