‘वर्क फ्रॉम होम’ मायक्रोसॉफ्टचा नफा वाढला


माय अहमदनगर वेब टीम
दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टची आर्थिक वर्ष 2020 च्या तिस-या तिमाहीत एकूण कमाई 35 अब्ज डॉलर राहिली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 15 टक्क्यांनी अधिक असल्याचे सांगितले जाते. या तिमाहीत कंपनीला 81 हजार कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. हा नफा मागील वर्षाच्या तुलनेत 22 टक्क्यांनी अधिक असल्याचे यावेळी सांगितले आहे.

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्या माहितीनुसार जगभरात येत्या दोन वर्षात पहावयास मिळणारा डिजिटल बदल हा दोन महिन्यातच पहावयास मिळाला आहे. आमची सर्व टीम खूप लांब बसून काम करत आहे. लॉकडाऊनच्या काळात विविध कंपन्यांचे नफा कमाईचे दर घटले आहेत. परंतु आमच्या कंपनीचा नफा वधारला असून ही बाब समाधानकारक असल्याचे म्हटले आहे.

ग्राहकांचा कल वर्क अॅॅण्ड लर्न होम’ याकडे वळल्याच्या कारणामुळे कंपनीच्या ग्राहक संख्येत मोठी वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. याचा लाभ कंपनीच्या नफा कमाईला झाल्याचे स्पष्ट केले आहे तर लायसन्स व्यवहार लिंक्डइन यावरील असणार्‍या जाहिरातीत मोठी घसरण झाली असल्याचे समोर आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post