..यांना राऊतांनी दिल्या हटके शुभेच्छा!



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्त शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. वाद-वादळातही राज यांच्याबरोबरची मैत्री टिकून राहिल्याचे सांगतानाच रसिक मनाचे राजकारणी, अशा शब्दात राऊत यांनी राज यांची स्तुती केली आहे. राऊत यांच्या या आगळ्यावेगळ्या शुभेच्छांमुळे राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. वाद-वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले, असे व्यंगचित्रकार. रसिक मनाचे राजकारणी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राऊत यांनी या ट्विटमधून राज यांची मनसोक्त स्तुती केल्यानेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
राऊत हे राज यांचे अत्यंत जुने सहकारी आहेत. मात्र, राज यांनी शिवसेना सोडल्यानंतर राऊत यांनी शिवसेनेतच राहणे पसंत केले. राज हे शिवसेनेपासून वेगळे झाले असले तरी कठिण प्रसंगात राज आणि उद्धव यांनी नेहमीच एकमेकांची साथ दिली आहे. राज यांना ईडीने चौकशीला बोलावल्यानंतरही शिवसेनेने राज यांचं उघड समर्थन केलं होतं. तर करोनामुळे राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अनेकदा जाहीरपणे राज यांचं नाव घेऊन त्यांच्याकडूनही करोना रोखण्याबाबत बऱ्याच सूचना येत असल्याचं सांगितलं होतं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राऊत यांच्या या हटके ट्विटला अधिक महत्त्व आलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post