पाच कंपन्यांचा मालकमाय अहमदनगर वेब टीम
भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांची दिग्गज कंपनी रिलायन्स जिओ आणि मार्क झुकेरबर्ग यांची प्रसिद्ध फेसबुक कंपनी या एकत्रित आल्यानंतर आता मार्क झुकेरबर्ग हे पाच कंपन्यांचे सीईओ बनले आहेत. फेसबुककडून जिओमध्ये जवळपास 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या व्यवहारानंतर फेसबुकची जिओमधील हिस्सेदारी 9.99 टक्क्यांच्या घरात पोहोचली आहे. झुकेरबर्ग यांच्याकडे फेसबुकसह अन्य कंपन्यांची मालकी आहे.

इंस्टाग्राम, मॅसेंजर, व्हॉट्सअप, ऑक्मयुलस, कॅलीबरा यासारख्या विविध प्लॅटफार्मचे ते नेतृत्व करतात. इंस्टाग्राम हे एक सोशल नेटवर्किंग अॅॅप आहे. यांचे सादरीकरण 2010 मध्ये करण्यात आले आहे. या अॅॅपचा वापर फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठी केला जातो. यांची निर्मिती केविन सिस्ट्रोम आणि माइक क्रिगर यांनी केली आहे. फेसबुकने 2012 रोजी 100 कोटी डॉलरला (जवळपास 7,200 कोटी रुपये) इंस्टाग्राम खरेदी केले आहे. तसेच व्हॉट्सअप हे एक सोशल नेटवर्किंग अॅॅप आहे. यांचे सादरीकरण 2009 मध्ये करण्यात आले आहे. याला फेसबुकने 2014 मध्ये 1 लाख 18 हजार कोटी रुपयाना खरेदी केले आहे. यांची निर्मिती जेन कूम आणि ब्रायन अॅॅक्टन यांनी केली आहे.
जगभरात यांचे 2 कोटी ग्राहक आहेत. व्हॉट्सअपची खरेदी केल्यानंतर काही आठवडयांमध्ये फेसबुकने वर्च्युअल रियल्टी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपनी ओकुलस वीआरची खरेदी केली होती. या कंपनीची स्थापना 2012 मध्ये करण्यात आली आहे. ओनावोची निर्मिती इस्रायलच्या कंपनीने 2010 मध्ये केली आहे. फेसबुकने ऑक्टोबर 2013 मध्ये आपल्या ताब्यात घेतले आहे.

काही संशोधकांच्या मते फेसबुकने 100 ते 200 दशलक्ष डॉलरमध्ये ही खरेदी केली आहे. आयओएस आणि अँड्राईड दोन्हींसाठी काम करणारे हे एक सिक्मयुरिटी अॅॅप आहे. मोबाइल कंपन्यांसाठी हे अॅॅप उपयोगी आहे. बेलुगा या अॅॅपची निर्मिती 2010 मध्ये करण्यात आली आहे. एक वर्षाच्या कालावधीनंतर फेसबुकने अॅॅपची खरेदी केली आहे. फेसबुकच्या हाती हे अॅॅप आल्यानंतर मात्र एक यशस्वी मॅसेंजर प्लॅटफार्म म्हणून यांचा उदय झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post