महिलेचा अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टरला अटक
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर तालुक्यातील जखणगाव येथे महिलेचा अवैधरित्या गर्भपात करणार्या डॉक्टरला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (दि.22) रात्री दहा वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.
जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये डॉ. शंकरप्रसाद दिगंबर गंधे (वय 50) हे अवैधरित्या गर्भपात करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्या माहितीनुसार पोलिस पथक सोमवारी रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यावेळी एक महिला त्या ठिकाणी आढळून आली. त्या महिलेकडे पोलिसांनी चौकशी केली असता डॉ. गंधे यांनी त्या महिलेचा अवैधरित्या गर्भपात केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत पोलिसांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना माहिती दिली. डॉ. मुरंबीकर यांनी पथकासह हॉस्पिटलमध्ये येवून पाहणी केली व त्यांच्या पाहणीच्या निष्कर्षातून डॉ. गंधे यांनी अवैधरित्या गर्भपात केल्याचे समोर आले. यावरुन पोलिसांनी डॉ. गंधे यांना अटक केली.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल कमलेश पाथरुट यांच्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 312, 313, 314 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जारवाल हे करीत आहेत.
Post a Comment