कुत्र्यांचा उपद्रव पुन्हा वाढल्याने नागरिक त्रस्त


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहराच्या मध्यवर्ती भागासह संपूर्ण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून महापालिकेकडे मात्र ही कुत्री पकडण्याची कुठलीच यंत्रणा उपलब्ध नसल्याने नागरिकांना दिवसा व सायंकाळ नंतर जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे.

शहरातल्या अर्बन बँक, माणिक चौक, काटे गल्ली, पानसरे गल्ली, शहाजी रोड या भागात गेल्या आठ दिवसांपासून रात्री कुत्र्यांची टोळकी मोठमोठ्याने भुंकत व आक्रमक होत असल्याने नागरिकांच्या झोपा खराब झाल्या आहेत. या भागातील नगरसेवक व केअर टेकर यांना कुत्र्यांची ही टोळकी दिसत नाहीत का? त्यांचा बंदोबत महापालिका का करत नाही? असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. श्वानदंशाची घटना घडल्या नंतर प्रशासनाला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. शहरात सिव्हिल हॉस्पिटल, बंगाल चौकी रस्ता या भागात मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे रोज फिरताना दिसत आहेत त्यांच्यामुळेही अपघाताचे प्रमाण वाढले असून तातडीने पावले उचलत मोकाट कुत्री व या भटक्या जनावरांचा बंदोबत करण्याची मागणी होत आहे. आयुक्तांनी या प्रश्नात लक्ष घालून ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post