कारची काच फोडुन चोरट्यांनी चोरले एवढा माल
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या कारची काच फोडुन 25 हजार रूपये किंमतीचा बॉक्स सॉकेटसह चोरून नेला. ही घटना सिव्हील हडको कॉलनी, मकासरे हेल्थ क्लब जवळ घडली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी शनिवारी (दि.13) सकाळी गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणी शबरी केनचेट्टी नजणा (वय-61, रा. सिव्हील हडको, मकासरे हेल्थ क्लबजवळ, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक धिरज अभंग हे करीत आहेत.
Post a Comment