म्हणून एचडी देवेगौडा राज्यसभा लढवणार


माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली – माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलर सर्वेसर्वा एचडी देवेगौडा यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे आमदार, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि अन्य नेत्यांच्या विनंतीवरून राज्यसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ही माहिती दिली आहे. तसेच ते उद्या म्हणजे मंगळवारी आपला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

यावर कर्नाटकचे माजी मंत्री डी के शिवकुमार या वर प्रतिक्रिया देताना म्हणाले, काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून कोणत्याही तिसर्‍या भाजप उमेदवारास राज्यसभेची निवडणूक जिंकू द्यायची नाही. या बाबत आमच्या नेत्या सोनिया गांधी या नक्की विचार करतील. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post