जिल्ह्यात ३ दिवस मुसळधार पावसाचा वेधशाळेचा इशारा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल झालेला असून सोमवार (दि.१५) पासून पुढील तीन दिवसांत अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक तसेच पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अहमदनगर, नाशिक तसेच पुणे जिल्ह्यतील घाट परिसरात येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.
दरम्यान अहमदनगर शहरासह जिल्ह्यात यावर्षी १ जून पासूनच दररोज कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत आहे. जिल्हयात गेल्या १५ दिवसात सुमारे १८६६.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या वर्षीच्या पावसाच्या हंगामातील सरासरी २५.८६ टक्के पाऊस गेल्या १५ दिवसातच बरसला असल्याने पाऊस या वर्षी सरासरी गाठेल असा अंदाज व्यक्त होवू लागला आहे. सोमवारी (दि.१५) सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हयात ६९.१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यात पाथर्डी – ४०, नगर -१८, कर्जत – ६, जामखेड – २ श्रीगोंदा, अकोले व श्रीरामपूर प्रत्येकी १ मिलीमीटर पाऊस बरसला आहे.
Post a Comment