सोसायटी समोर विरोधी संचालकांचे ठिय्या आंदोलन


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या रविवारी झालेल्या संचालक मंडळाच्या सहविचार सभेमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सभासद हिताचे निर्णय घेण्यासाठी परिवर्तन मंडळाच्यावतीने विरोधी संचालक व सभासदांनी सोसायटी समोर ठिय्या दिला. तर सभासद हिताचे निर्णय घेण्याची मागणी केली.

शासनाच्या नियमांचे व फिजीकल डिस्टन्सचे पाळन करीत सोसायटीचे विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंतराव खेडकर समवेत एन.आर. शितोळे, बी.आर. जीवडे, शिरीष टेकाडे, प्रसाद साठे, देवीदास पालवे, प्रसाद बारगजे, अर्जुन भुजबळ, एस.सी. नरसाळे, बी.जे. शिंदे आदि उपस्थित होते.

सहविचार सभेच्या विषय क्र.9 व 10 नुसार 2019-20 या आर्थिक वर्षासाठी तरतूद बाबत विचार विनिमय करुन, आर्थिक वर्षातील नफा वाटणी बाबत सभासद हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा. कोरोना महामारीचे संकट चालू असताना सर्वसाधारण सभेस परवानगी न मिळाल्यास लाभांश व ठेवीवरील व्याज सभासदांच्या खात्यात त्वरीत जमा करावे, सभा न झाल्यास मिटिंग भत्ता रोख स्वरुपात सभासदांना मिळावा, अनावश्यक तरतुदी रद्द करून 15 टक्के लाभांश मिळावा, जामीन कर्ज मर्यादा 15 लाख रुपये करावी, सभासदांच्या कायम ठेवीवरील व्याजदर वाढवावा, ऑडिट फी वरील 65 लाख रुपयांची तरतूद कमी करावी, रिझर्व बँकेने कोरोनाच्या संकटकाळात तीन महिने हप्ता वसुलीस स्थगिती दिली असून, सोसायटीने देखील सभासदांच्या मागणीनुसार लेखी अर्ज घेऊन हप्ता वसुलीस स्थगिती देण्याची मागणी परिवर्तन मंडळाच्यावतीने करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post