शाळांनी फी सक्ती केल्यास गुन्हे दाखल करा ; यांनी केली मागणी



माय अहमदनगर वेब टीम
पुणे  – कोवीड-19या विषाणुमुळे देशात व राज्यात लॉकडाऊन जाहीर केले होते लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड भागातील उद्योग,व्यवसाय, नौकरी, बंद आहेत. परीणामी बंदमुळे संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि उपजिविकेची साधने ठप्प आहेत. अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरातील इंग्रजी माध्यमातील खाजगी व विनाअनुदानित अनेक शाळांकडून ऑनलाईन क्लासेसचा बहाणा करून शाळा सुरू झाल्याचे सांगून पालकांना संपूर्ण फी ची रक्कम भरायला भाग पाडतं आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

राज्याचे शिक्षण संचालक यांना दिलेल्या निवेदनात ब्रिगेडचे पदाधिकारी म्हणतात, पालकांच्या अनेक तक्रारी संभाजी ब्रिगेडकडे आलेल्या आहेत. राज्य सरकारने 8 मे रोजी राज्यातील शालेय शुल्क जमा करण्याची सक्ती न करण्याचे परिपत्रक काढलेले असुन सुद्धा राज्य सरकारच्या परिपत्रकाला न जुमानणार्‍या मुजोर शाळा चालक ( मुख्याध्यापक व संस्था चालक) यांचेवर तात्काळ गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याच्या पोलीस प्रशासनास शासनामार्फत सुचना द्याव्यात. अन्यथा अशा शाळांना, संस्थाचालकांना संभाजी ब्रिगेड स्टाईल ने धडा शिकवला जाईल. याची सर्वंस्वी जवाबदारी शासनाची असेल याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतिश काळे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, प्रमोद गोतारणे यांची स्वाक्षरी आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post