पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले…




माय अहमदनगर वेब टीम
पुणे  – मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलेल्या प्रश्नाबाबत बोलताना केले.

भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्राला लागलेला करोना असं म्हटलं होतं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलन केलं.

या सर्व प्रकरणात खुद्द शरद पवार यांची भूमिका काय आहे, याची सर्वांना उत्सुकता आहे. शरद पवार याबाबत पुण्यात भाष्य करतात का, याकडे माध्यमांचं लक्ष होतं. मात्र, शरद पवारांनी मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन, असं म्हटलं आहे.

पुण्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

या बैठकीनंतर शरद पवार यांनी महापालिकेच्या स्मार्ट सिटी सेंटरमधील कोविड सेंटरला भेट दिली. त्याठिकाणी त्यांनी डॅशबोर्ड प्रणालीचीदेखील माहिती घेतली. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड, महापौर मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post