टाटा स्काय बदलणार चॅनेलचे पॅकेजमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - टाटा स्काईने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना कायम ठेवण्यासाठी मासिक बिले कमी करण्याची योजना आखली आहे. ही डीटीएच कंपनी यासाठी चॅनेलचे पॅकेजमध्ये बदल करू शकते अशी माहिती आहे. मासिक बिले भरण्यासाठी लॉकडाऊनमुळे बरेच ग्राहक डीफॉल्ट होऊ शकतात अशी कंपनीला भीती आहे. म्हणून कंपनी आपले विद्यमान प्लॅनमध्ये बदल किंवा रद्द करू शकते.

जवळपास 13 लाख ग्राहकटाटा स्कायपासून दूर गेले आहेत
सुत्रांनी सांगितले की, या नवीन बदलामुळे कंपनीच्या 40 टक्के ग्राहकांचे मासिक बिल घटून 350 रुपये किंवा त्यापेक्षा कमी होऊ शकते. कंपनी ग्राहकांना रोखण्यासाठी हे पाऊल अगोदरच घेत आहे. टाटा स्कायचे प्लॅन महाग वाटल्यामुळे मागील दोन महिन्यांत जवळपास 13 लाख ग्राहकांनी टाटा स्कायचे कनेक्शन बंद केले आहे. 13 लाख ग्राहकांनी हा प्लॅन रिन्यू केला नव्हता.
नवीन प्रसारणेअभावी ग्राहक चॅनेलकडे पाठ फिरवित आहेत

आकडेवारी सांगते की, मे महिन्यात टाटा स्कायच्या संकेतस्थळावर किंवा अॅपवर लॉग इन केलेल्या 50 लाख ग्राहकांपैकी 70 टक्के ग्राहक मासिक बिले कमी करण्यासाठी वाहिन्यांची संख्या कमी करण्याचा विचार करीत होते. नवीन करमणूक आणि नवीन प्रसारण नसल्यामुळे ग्राहक आता चॅनल्सकडे पाठ फिरवित आहेत.

कंपनीकडे एकूण 1.8 कोटी ग्राहत आहेत
लॉकडाउनमुळे ग्राहक खर्च कमी करण्याकडे लक्ष देत आहेत. टाटा स्कायने सुमारे 60-70 लाख ग्राहकांची यादी तयार केली आहे. या ग्राहकांना या पॅकेजचा लाभ मिळू शकतो. कंपनीकडे एकूण 1.8 कोटी ग्राहक आहेत. चॅनलची संख्या कमी झाल्यानंतर ग्राहकांचे मासिक बिल 60-100 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. मार्चमध्ये लॉकडाउनपूर्वी टाटा स्कायच्या प्लॅटफॉर्मवर 10 इनअॅक्टीव्ह सब्सक्राइबर्स परत आले होते. परंतु एप्रिलमध्ये 10 लाख आणि मे महिन्यात 3 लाख ग्राहकांनी रिजार्च केले नाही.

कोविड-19 झाला वाईट परिणाम
जेव्हा कंपनीने याची तपासणी केली तेव्हा त्यांना समजले की, ते लोकांना 400 रुपयांपेक्षा कमी मासिक प्लॅन हवा होता आणि म्हणूनच त्यांनी हा प्लॅन रिन्यूअल केला नाही. या ग्राहकांना कोविड-19 चा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मासिक प्लॅनचे पैसे देण्यास या लोकांना अडचणी येत आहेत. यामुळे कंपनी या ग्राहकांना काय ठेवण्यासाठी मासिक प्लॅन कमी करण्याची योजना तयार करत आहे. यासाठी चॅनलची संख्या कमी करण्याबरोबरच पॅकेज देखील कमी केले जाईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post