या करोना बाध‍ितांना राज्यपालांकडून मदतीचा हात


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - डाक विभागातील करोना बाध‍ित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज एक लाख रुपयांचे वैयक्तिक योगदान दिले.

राज्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हर‍िशचंद अग्रवाल यांनी आज राजभवन येथे राज्यपालांकडून एक लाख रुपये रकमेचा धनादेश स्व‍िकारला. यावेळी सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल श्रीनिवास व्यवहारे हे देख‍िल उपस्थित होते.

डाक विभागातर्फे नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत राज्यपाल कोश्यारी यांना प्रथम क्रमाकांचे २५००० रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले होते. या रकमेत स्वत:चे ७५००० रुपये जोडून ही रक्कम राज्यपालांनी डाक विभागातील करोना बाध‍ित कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कल वेलफेअर फंडाला दिली.

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने “ढाई आखर” पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत “प्रिय बापू अमर है” या व‍िषयावर आंतरदेश‍िय पत्र प्रवर्गात केलेल्या निबंध लेखनासाठी राज्यपालांना प्रथम क्रमाकाचे पारितोषीक प्राप्त झाले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post