..असे टिकवा चाळिशीनंतरही तारुण्य


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - या वयामध्ये बर्‍याच वेळेला हार्मोन्सच्या असंतुलनामुळे मलावस्तंभाचा त्रास होतो. गायीचे तूप वापरले असता हा त्रास कमी होतो. तसेच तुपामुळे सर्व सांध्यांमध्ये लवचीकता निर्माण होते. त्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी हे आजार आटोक्यात राहतात. वरणाला फोडणी देताना, पोळ्या करताना तेलाऐवजी गायीच्या तुपाचा वापर करावा. तसेच भाज्या करताना शेंगदाण्याऐवजी ओल्या नारळाचा वापर करावा.

मगज बीचाही वापर करू शकता. त्यामुळे वजन आटोक्यात राहते. तसेच अतिरिक्त चहा, कॉफी व शीतपेय घेणे टाळावे; त्यामुळे आरोग्य बिघडते. चहाऐवजी वेलची व हळद घालून दूध प्यावे. शीतपेयांऐवजी कैरीचे पन्हे, लिंबू गूळ सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत प्यावे. चाळिशीमध्ये शक्यतो उपवास टाळावेत. उपवासामध्ये साबुदाणा टाळावा.

उपवासाच्या दिवशी जेवणाची नियमित वेळ पाळावी. फक्त जेवणाऐवजी ताजी फळे, फळांचा ज्यूस, शहाळ्याचे पाणी, ताक, खजूर व ड्रायफ्रूट्स खावेत. काहीही न खाता उपवास करू नये; कारण यामुळे शरीरातील पेशींची झीज होते व या वयामध्ये शरीराचीही हानी भरून येत नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post