अॅपआधारित पेमेंट वाढले!
माय अहमदनगर वेब टीम
देशातील मोबाईल अॅपवर आधारित पेमेंट 163 टक्क्यांनी वधारुन 287 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचले आहे. अॅपचा वापर करुन करण्यात येणा़र्‍या मोबाईलवरील पैशाच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, अशी माहिती एस अॅण्ड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजेंसने आपल्या अहवालात दिली आहे.

यामध्ये डेबिट आणि पेडिट कार्डच्या आधारे पॉंईट ऑफ सेल (पीओएस) देवाण घेवाण 24 टक्क्यांनी वाढून 204 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे. यामध्ये ऑनलाईन आणि अॅपवरुन करण्यात आलेल्या पेमेंटचा समावेश करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीमधून पेमेंट अॅपच्या आधारे आता सर्वाधिक वेगाने आर्थिक देवाण घेवाण करण्याकडे कल आहे. यामध्ये प्रामुख्याने मोबाईल फोन रिचार्ज, बिल पेमेंट व अन्य मोबाईलचा वापर करुन पेमेंट करण्यात वाढ झाली आहे.

यात प्रत्येक एटीएमचा वापर केल्यानंतर भारतीयांनी कार्ड किंवा मोबाईल फोनच्या आधारेही देवाण घेवाण केली आहे. मागील वर्षापासून डिजिटल पेमेंटमध्ये तेजी आली आहे आणि ही पुढेही अशीच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. देशातील डिजिटल पेमेंटने 2019 पासूनच तेजी धरली आहे. यामध्ये 31 डिसेंबर 2019 मध्ये समाप्त तिमाहीत कार्ड आणि मोबाईल पेमेंट सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) च्या बरोबरीत 20 टक्क्यांवर असल्याचे सांगितले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post