दहा महिन्याच्या चिमुकल्याची करोनावर मात
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – श्रीगोंद्यातील दहा महिन्याच्या बाळाने करोनाला हरवित ठणठणीत बरे होत नगरकरांना दिलासा दिला. याशिवाय आज जिल्ह्यात पाच जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत 95 जण ठणठणीत बरे झाल्याने सुखरूप घरी पोहचले.
जिल्ह्यातील करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज 5 रुग्ण करोनामुक्त झाले. श्रीगोंदा फॅक्टरी येथील दहा महिन्याच्या बाळासह इतर चार जण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोनामु्क्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 95 झाली आहे. येथील बूथ हॉस्पिटलमधून या बालकासह पिंपळगाव खांड (ता. अकोले) येथील 45 वर्षीय व्यक्ती आणि 18 वर्षीय युवती, नेवासा बु. येथील 24 वर्षीय युवकाला आज घरी सोडण्यात आले.
संगमनेर येथील 65 वर्षीय व्यक्तीही करोनामुक्त झाला आहे मात्र, त्या रुग्णाला एक दिवस देखरेखीखली ठेवण्यात येणार असून सध्या हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार असून उद्या त्याला घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
Post a Comment