...कर वाढवण्याचा विचार नाही


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – करोनाबाबत महाराष्ट्र सरकारने सर्वांची विशेष काळजी घेतली आहे. यामध्ये सरकार कोणत्याही बाबतीत कमी पडणार नाही. जनतेचा जीव महत्वाचा आहे, असे राज्याचे महसूल राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीनंतर मंत्री थोरात बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह उपस्थित होते.

महसूल मंत्री ना. थोरात म्हणाले की, ‘करोनाचे देशावर नाही तर जगावर संकट आले आहे. त्यामुळे या संकटाचा सर्वांनी मुकाबला करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतलेली आहे. जनतेला कोरोनातून बाहेर काढायचे आहे. यासाठी सर्व यंत्रणा अहोरात्र काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने चांगल्या उपाययोजना केल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखता आला. प्रशासकीय पातळीवर सुद्धा सर्वांनी चांगले काम केले. राज्य सरकारला केंद्र सरकारकडून 1600 कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र ही रक्कम आगोदरच आलेली आहे. त्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यातून आम्ही हा खर्च करत आहे. हा निधी दरवर्षी राज्याला मिळत असतो. आपत्कालीनसाठी हा निधी वापरला जातो. मात्र आम्ही अजूनही निधी द्यावा, अशी मागणी केंद्राकडे करत असल्याचे त्याांनी स्पष्ट केले. दरम्यान केंद्रकडे अनेक योजनांचा हिस्सा राज्याला येणे बाकी आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये 5400 कोटी रुपयांचा जीएसटीचा परतावा मिळणे गरजेचे आहे. वारंवार मागणी करून देखील तो हिस्सा मिळाला नाही. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे जसा राज्याला आर्थिक ताण आहे. तसाच केंद्रावर सुद्धा आर्थिक ताण असल्याचे मंत्री थोरात म्हणाले.

निसर्ग वादळाने सर्वत्र नुकसान झाले आहे. मुंबई,अलिबाग, यासह महाड या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तेथील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे नुकसान किती झाले, हे सांगणे आता कठीण आहे. त्यातच नगर जिल्ह्याला देखील फटका बसला आहे. दुर्दैवाने नगर जिल्ह्यात एक जणाला जीव गमवावा लागला. मात्र नगर जिल्ह्याला सह्याद्रीच्या कड्यामुळे या वादळाचा फटका कमी प्रमाणात बसला आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत असल्याचे ते म्हणाले. महसुली उत्पन्नाचा संदर्भात विचारलं असता मंत्री थोरात म्हणाले, लॉकडाऊन उठल्यानंतर हळूहळू व्यवहार सुरळीत होत आहे. मात्र लॉक डाऊनचा निश्‍चितपणे उत्पन्न वाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे खर्चामध्ये कपात करता येईल का, किंवा अन्य काही बाबी आहेत का याचा सुध्दा विचार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. सरकार देखील उपाययोजना करत आहे. नागरिकांनी सुद्धा स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. त्यांना सांगितलेल्या अटी, नियमाचे पालन करून प्रशासनाला साथ दिली पाहिजे. स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे मंत्री ना. थोरात म्हणाले.

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी युवकांना महामंडळामध्ये घेतले पाहिजे, अशी मागणी केली. त्यावर ना. थोरात म्हणाले, ‘त्यांनी केलेल्या मागणीत गैर काही नाही. त्यांची केलेली मागणी रास्त आहे. महिला आघाडी, पक्षातील इतर आघाड्या सुद्धा अशा प्रकारच्या मागण्या करत असतात. त्याचा पाठपुरावा पक्षाकडून सुरू असतो.

कर वाढवण्याचा विचार नाही

राज्याचे उत्पन्न वाढावे म्हणून अधिक कर लावावा असा कोणताही विषय सध्या नाही. दरम्यान मंत्र्यांच्या समवेत विविध विषयांवर चर्चा वेगळ्या माध्यमातून होत असते. सध्याची करोनाची परिस्थिती पाहता त्यावर लगेच निर्णय घेणे अपेक्षित नाही. मात्र त्या संदर्भामध्ये निर्णय प्रक्रिया सुरू असल्याचेही मंत्री थोरात म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post