या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवा


माय अहमदनगर वेब टीम
पुणे – दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं खुलासा केला आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणार्‍या दहावी आणि बारावीच्या निकालांच्या तारखांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन मंडळाने केले आहे.

दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख मंडळानं आजपर्यंत जाहीर केलेली नाही. माञ दहावी आणि बारावीच्या निकालाचा वेगवेगळ्या तारखा सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. त्यामुळं या तारखांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये, असं आवाहन शिक्षण मंडळाने केलं आहे.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. या निकालाची तारीख मंडळामार्फत मंडळाच्या अधिकृत प्रसिद्धी माध्यम, वर्तमानपत्र, मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत सर्व संबंधित विद्यार्थी, पालक, शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने नोंद घ्यावी, असा मंडळाच्यावतीने आवाहन करण्यात आलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post