मावा विकण्याच्या कारणावरून झाली ही घटनामाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – मावा विकण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी 30 वर्षीय हॉटेल व्यावसायिकास लोखंडी चेन, व झार्‍याने मारून जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि.19) सायंकाळी 5 वा. केडगाव शिवारातील अंबिका टी सेंटर, नगर-पुणे रोड येथे घडली.

याबाबतची माहिती अशी की, अमोल मोहन शिंदे (वय- 30, रा. तिरंगा चौक, वैष्णवनगर, केडगाव) याचे व रिंकु पाळंदे व राधाकृष्ण राधाकृष्ण सुभाष पाळंदे (दोघे रा. राधाकृष्ण कॉलनी, एकनाथ नगर, केडगाव) यांचे मावा विकण्याच्या कारणावरून भांडण झाले. या भांडणाचा मनात राग धरून रिंकु व राधाकृष्ण याने अमोल यास लोखंडी चेन व झार्‍या फेकुन मारल्या व जखमी केले. तसेच यावेळी शिवीगाळ करून ठार मारण्याचीही धमकी दिली.

या प्रकरणी अमोल शिंदे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास पोलिस नाईक डोळे हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post