धारदार शस्त्राने मारुन खुनाचा प्रयत्न


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- अज्ञात कारणाने 55 वर्षीय इसमास धारदार शस्त्राने डोक्यात व तोंडावर मारुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना स्टेशन रोडवरील लोखंडी पुलाजवळ शुक्रवारी (दि.19) रात्री 10.30 वाजता घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी फोन करुन कोतवाली पोलिस ठाण्यात अशी माहिती दिली की, 55 वर्षीय एक इसम जखमी अवस्थेत लोखंडी पुलाजवळ पडला आहे. या माहितीवरुन पोलिस कॉन्स्टेबल रोहिदास गुंडाळे व होमगार्ड प्रसाद पाटोळे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता एक इसम जखमी अवस्थेत पडलेला दिसून आला. पोलिसांनी चौकशी केली असता त्याचे नाव किशोरदास (पूर्ण नाव माहित नाही) असे कळाले. त्यास छबू नावाच्या इसमाने अज्ञात कारणावरुन धारदार शस्त्राने डोक्यात व तोंडावर मारुन खुनाचा प्रयत्न केला, अशी माहिती मिळाली. यावेळी पोलिसांनी लोखंडी पुलाच्या दिशेने एका इसमास पळून जात असताना पाहिले. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळून आला नाही. याप्रकरणी पो.कॉ. रोहिदास गुंडाळे यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास कोतवाली पोलिस हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post