युवकांना संशयितरित्या फिरताना पोलिसांनी पकडले


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेवुन काहीतरी गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या मोटारसायकलवरून फिरणार्‍या तिघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.26) पहाटे 3 च्या सुमारास घडली.

कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक काकडे व पोलिस कॉन्स्टेबल नितीन फुलारी हे केडगाव परिसरात पेट्रोलिंग गस्त करीत असताना पहाटे 3 च्या सुमारास केडगाव- अंबिकानगर बसस्टॉपजवळ अंधारात तीन व्यक्ती मोटारसायकलवर बसून संशयितरित्या वावरतांना त्यांना आढळून आले. पोलिसांना त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे शेख दानिश फारूक (वय 23, रा. तांबटकरगल्ली), अजहर नवाजउद्दीन सय्यद (वय 22, रा. समीरनगर, मुकुंदनगर), दारूवाला शिफान शकील (वय 23, रा. मुल्ला कॉलनी, मुकुंदनगर) असे सांगितले. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्‍नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्यांच्याकडील पल्सर मोटारसायकल (क्र. एम एच 16 एस 3585) सह त्या तिघांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नितीन फुलारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 122 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील कारवाई पोलिस नाईक डोळे हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post