५ लाखांहून अधिक नागरिकांना पोहोचवलं 'यांनी' घरी


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन  घोषित केला होता. या लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील नागरिक व श्रमिकांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी श्रमिक एक्स्प्रेसप्रमाणे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसही राज्याच्या चहुबाजूच्या सीमेपर्यंत धावल्या. एकूण ४४ हजार १०६ बस फेऱ्यांमधून ५ लाख ३७ हजार ५९३ स्थलांतरीत नागरिकांना रेल्वेस्टेशनपर्यंत तसेच त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ३१ मे पर्यंतच्या या अभियानात एस.टी बसेसनं तब्बल १५२.४२ लाख कि.मीचा प्रवास केला.
परराज्यातील नागरिकांना सुखरुप त्यांच्या राज्यात परतता यावे यासाठी महामंडळाने बसेस उपलब्ध करून दिल्या. एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुखरूप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन पोहोचवलं आणि त्यासाठी राज्य शासनाने तब्बल १०४.८९ कोटी रुपयांचा खर्च केला. औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती अशा सहा प्रदेशातून नागरिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत जाण्यासाठी, रेल्वेस्टेशनपर्यंत जाण्यासाठी एस.टी महामंडळाने बसची सुविधा उपलब्ध करून दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post