या बड्या अधिकाऱ्याला करोनाचा संसर्ग


माय अहमदनगर वेब टीम
पुणे – लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता पुणे पोलिसांमध्ये ही करोनाची व्याप्ती वाढू लागली आहे. आतापर्यंत पोलिसांपर्यंतच मर्यादित असलेल्या करोनाच्या विळख्यात एसीपी(सहायक पोलीस आयुक्त) अडकले आहेत. एसीपीलाच करोनाची बाधा झाल्यानं पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. एसीपीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर संपर्कात आलेल्या अधिकार्‍यांना आणि पोलिसांना होम क्वांरंटाईन करण्यात आलं आहे.

करोना बाधित एसीपींचं कार्यालय पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात आहे. पोलिस आयुक्तालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांच्या थेट संपर्कात होते. राज्यासह देशात गाजलेल्या काही प्रकरणांचा तपास त्यांनी केलाय. त्याच बरोबर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि राजकीय नेत्याच्या चौकशीचा प्रकरणही त्यांच्याकडेच होती. अशा बड्या अधिकार्‍याला करोनाची बाधा झाल्यानं वरिष्ठही चिंतेत आहेत.

पुण्यात आतापर्यंत 57 पोलिसांना करोना बाधा झाली असून 31 जणांना डिस्चार्ज झालेत.तर सहाय्यक फौजदारसह दोघा पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस दलात वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात आल्यात. अनेक ज्येष्ठ पोलिसांना सॉफ्ट ड्युटी देण्यात आली. त्याचबरोबर आर्थिक मदत ही दिली जात आहे. काही रुग्णालयांमध्ये खास पोलिसांसाठी रिझर्व बेडही ठेवण्यात आलेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post