माळीवाडा, भवानी नगर, अकोले, संगमनेर, शेवगावमध्ये कोरोना रुग्ण सापडले
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर मध्ये कोरोना रुग्ण थांबायला तयार नाहीत. आज पुन्हा नगर शहरात दोन, संगमनेर, शेवगाव, अकोले या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 152 झाली आहे.
*जिल्ह्यात आणखी ०५ नवीन रुग्ण.*
*अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील पंचवीस वर्षे युवकाला कोरोनाची बाधा
* शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथील तीस वर्षीय युवक कल्याण येथून येऊन जिल्हा रुग्णालयात दाखल. कल्याण येथे फायर ब्रिगेड मध्ये कर्मचारी. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह.
*अहमदनगर शहरातील भवानीनगर मार्केट यार्ड येथील 29 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण. खोकला आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने झाला होता ऍडमिट.
*घुलेवाडी संगमनेर येथील 35 वर्षीय युवक बाधित. कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आला होता.
*अकोले तालुक्यातील कोतुळ येथील 32 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण. Ghatkoperhun आला होता गावी.
*आज आणखी ०३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज*
जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली ७.श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ३२ वर्षीय रुग्ण, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील २४ वर्षीय युवक आणि अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील ५६ वर्षीय व्यक्ती कोरोनातून बरे झाले.
Post a Comment