सुशांतच्या आत्महत्येबाबत 4 प्रश्न उपस्थित ; 17 लोकांची केली चौकशीमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आत्महत्या केल्याची पुष्टी झाली आहे. जीव गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. सुशांतच्या मानेवरील फासाचे डाग वगळता त्याच्या शरीरावर इतर कोणत्याही जखमाचे निशाण नाहीत. सध्या पोलिस या प्रकरणात सर्व बाजूने तपास करत आहेत. सुशांतच्या आत्महत्येमागचे नेमके कारण काय होते याचाही शोध पोलिस घेत आहेत.

फ्लॅटची फॉरेन्सिक तपासणी, आतापर्यंत 17 जणांची चौकशी केली
सोमवारी फॉरेन्सिक तज्ञांची टीम सुशांतच्या घरी पोहोचली. पोलिस आधीपासून त्याच्या होते. याप्रकरणी सुशांतच्या मित्रांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सुशांतची बहीण मीतू सिंहचे स्टेटमेंट देखील घेण्यात आले आहे.

मीतू कुटुंबातील पहिली सदस्य होती, जिने सुशांतचा मृतदेह लटकताना पाहिला होता. याशिवाय पोलिसांनी आतापर्यंत 17 लोकांची चौकशी केली आहे. यामध्ये कुटुंबातील काही सदस्यांचा समावेश आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार, पोलिस सुशांतची निकटवर्तीय अभिनेत्री रिया चक्रबर्तीची देखील चौकशी करणार आहे.
सुसाइड नोट न मिळाल्यानंतर पोलिस या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत
1. सुशांतच्या कुटुंबीयांनी शंका उपस्थित केली आहे?
सुशांतच्या मृत्यूमागे काहीतरी गडबडीच्या शक्यता असल्याचा आरोप सुशांतसिंग राजपूत यांचे मेहुणे आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी ओपी सिंह यांनी केला आहे. ते या घटनेच्या चौकशीचे मागणी करत आहेत. याआधी रविवारी सुशांतचे मामाने पाटण्यात म्हटले होते की, त्याने आत्महत्या केलीच नाही. हा खून आहे आमि पोलिसांनी याची चौकशी करावी. ओपी सिंग हे हरियाणामधील अतिरिक्त पोलिस महासंचालक आहेत आणि तेथे मुख्यमंत्री कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून तैनात आहेत.

2. सुशांतची तब्येत खरंच खराब होती, मग त्याच्या वतीने कोण निर्णय घेत होता?
ओपी सिंह म्हणाले की, आम्ही कोणावरही प्रश्न उपस्थित करत नाहीत. पण सुरुवातीला ही खेळीमेळीची बाब असल्याचे दिसते. सूत्रांच्या माहितीनुसार ओपी सिंह यांनी पोलिसांना सांगितले की सुशांत अनेक दिवसांपासून कुटूंबियांशी बोलत नव्हता. सुशांतच्या वतीने कोण निर्णय घेत होता याची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे.

3. अभिनेता महेश शेट्टीला रात्री 1.51 वाजता कॉल का केला?
रिपोर्ट्सनुसार, सुशांतने त्याचा मित्र आणि अभिनेता महेश शेट्टीला रात्री 1.51 वाजता फोन केला होता. महेश शेट्टी आणि सुशांत दोघांना 'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेत काम केले होते. महेशने फोन उचलला नाही तेव्हा सुशांत झोपायला गेला. महेशने सांगितले की, जेव्हा तो सकाळी उठला तेव्हा त्याने 8.30 वाजता सुशांतला कॉल केला. परंतु त्याने फोन उचलला नाही. महेशला वाटले की, तो नंतर कॉल करेल. परंतु यानंतर महेशला सुशांतच्या आत्महत्येची बातमी समजली.

4. काही दिवसांपूर्वीपर्यंत सोबत राहिलेल्या अभिनेत्रीने सुशांतचे घर का सोडले?
सुत्रांनुसार, मुंबई पोलिस अभिनेत्री रियाची चौकशी करणार आहे. रिया काही दिवसांपूर्वीपर्यंत सुशांत सिंह सोबत होती. रिया आणि सुशांतने 6 महिन्यांपूर्वी माउंट ब्लँक सोसायटीमध्ये एकत्र फ्लॅट भाड्याने घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वीपर्यंत ही अभिनेत्री येथे राहत होती. करारपत्रातही दोघांची नावे आहेत. हा फ्लॅट 36 महिन्यांसाठी भाड्याने घेतला होता आणि 9 डिसेंबर 2022 रोची याची मुदत संपत होती. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मोठ्या सुटकेससह निघून गेली होती, अशी पुष्टी इमारतीच्या चौकीदाराने पोलिसांना दिली आहे. सुशांतचा नोकर दीपकने त्या सुटकेसला गाडीत ठेवण्यास मदत केली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post