18 कोटींची कमाई करुन रोनाल्डो नंबरल वन, तर कोहली
माय अहमदनगर वेब टीम
स्पोर्ट डेस्क - लॉकडाउनदरम्यान जिथे लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि कमाई बंद झाली. तिथे, खेळाडूंवर याचा काहीच परिणाम झाला नाही. या लॉकडाउनदरम्यान युवेंटसचा स्टार स्ट्राइकर क्रिस्टियानो रोनाल्डोने इंस्टाग्रामवरुन 18 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रोनाल्डो या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन झालेल्या कमाईच्या बाबतीत एक नंबरला आहे. तर, या यादीत विराट कोहली सहाव्या स्थानावर आहे. कोहलीने इंस्टाग्रामवर तीन स्पॉन्सर्ड पोस्टमधून एकूण 3.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
अटॅन मॅगजीनने 12 मार्च ते 14 मे दरम्यान या खेळाडूंच्या कमाईबाबत एक रिपोर्ट तयार केली. कोहलीला प्रत्येक पोस्टसाठी 1,26,431 पॉन्ड (अंदाजे 1.2 कोटी रुपये) मिळाले. कोहलीचे इंस्टाग्रामवर 6.2 कोटी फॉलोअर्स आहेत. तो इंस्टाग्रामवर देशातील सर्वात जास्त फॉलो केला जाणारा व्यक्ती आहे. कोहली टॉप-10 खेळाडूंच्या यादीत एकमेव भारतीय आहे.
रोनाल्डोचे इंस्टाग्रामवर 22 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर
या यादीत टॉपवर पुर्तगाली फुटबॉलर रोनाल्डोने 18,82,336 पॉन्ड (अंदाजे 17.9 कोटी रुपये) कमवले. रोनाल्डोचे इंस्टाग्रामवर 22.2 कोटी फॉलोअर आहेत. इंस्टाग्रामवर फॉलो करणाच्या बाबतीत तो जगात नंबर एकवर आहे.
Post a Comment