ट्रक पळविणारे सोलापूरचे 14 वाळू तस्कर जेरबंद


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - केडगाव येथील फायनान्स कंपनीच्या खाजगी पार्कींगमधून ट्रक पळविणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील 14 वाळू तस्करांच्या मुसक्या कोतवाली पोलिसांनी 12 तासात आवळल्या. पुणे- सोलापूर हायवेवर दौंड पोलीस ठाणे हद्दीत कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांच्या पथकाने ही जिगरबाज कामगिरी केली. प्रदीप प्रकाश शिंदे, जगदीश बाळासाहेब शिंदे, सागर बाळू सरगर, निखिल लहू वाकळे, प्रदीप बाळासाहेब शिंदे (सर्व रा. मेडसिंगी ता. सांगोला जि. सोलापूर), लखन धानाजी कांबळे, दीपक दगडू शिंद, नवनाथ मुरलीधर खरकाळे (तिघे रा. अकोला ता. सांगोला जि. सोलापूर), अजित धोंडिराम मिसाळ (रा. चिनके ता. सांगोला जि. सोलापूर), नवनाथ रमेश पाटील (रा. ओलेगाव ता. सांगोला जि. सोलापूर), मनोहर शिवाजी सरपळे, सौरभ सुखदेव मोरे (दोघे रा. आंधळगाव ता. मंगळवेढा जि. सोलापूर), हनुमंत मारुती गावडे, अजय सिताराम भोसले (दोघे रा. वारेगाव ता.सांगोला जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

नगर- पुणे रोडवरील केडगाव शिवारात सुनील विठ्ठल गोंडाळ (वय- 38 रा. चास ता. नगर) यांचे पार्किंग यार्डमध्ये दोन चारचाकी वाहनातून आलेल्या 12 ते 15 जणांनी आत प्रवेश केला. त्याच्या जवळ असलेल्या लाकडी दांडके, लोखंडी राँडने तेथे असलेल्या सुधाकर पाटील, संजय पगारे, अभिषेक गोंडाळ, सुनील गोंडाळ यांना मारहाण करत दहशत निर्माण केली. या यार्डमध्ये पार्क केलेला टाटा ट्रक (क्र. एमएच- 45 एएफ- 3005) पळवून नेला. या प्रकरणी सुनील गोंडाळ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post