शुद्धलेखन ठेवा खिशात या पुस्तकाचे लेखक यांचे निधन



माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - शुद्ध मराठी भाषेचा आग्रह धरणारे शुद्धलेखन तज्ञ तसेच शुद्धलेखन ठेवा खिशात या छोट्या पुस्तिकेद्वारे शुद्ध मराठी भाषा घराघरात पोहोचवणारे मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. आज नाशिक शहारत त्यांचे निधन झाले.  आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. नाशिक येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे.

दिवंगत फडके गेल्या चार वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास होते. शुद्धलेखन हा आग्रह न होता सवय झाली पाहिजे असे ते नेहमी म्हणायचे. आज सकाळी दहा वाजता नाशिकमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फडके यांच्या जाण्याने मराठी भाषेची मोठी हानी झाली असून मराठी भाषेवर प्रेम करणारे गुरुवर्य गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

भाषा या विषयात गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखन नियम या चारही विभागांना समान गुणसंख्या असेल तर शुद्धलेखनाचे अध्ययन गांभीर्याने होईल, असे त्यांचे मत होते.

लेखन नियम आणि व्याकरणाकडे दुर्लक्ष केल्यास भाषा संकटात येईल असे त्यांना वाटे. त्यामुळे त्यांनी मराठी भाषेत शुद्धलेखन किती महत्वाचे हे ते नेहमी पटवून देत असत.  नेहमी लेखन शिबीर, संपादन शिबिरे ते घेऊन मराठी भाषेवरचे ज्ञान वाढविण्यासाठी प्रयत्न करत असत. साहित्य क्षेत्रातील फडके यांच्या जाण्याने मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post