अर्थमंत्र्याकडून मोठी घोषणा


माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली – अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. त्या पॅकेजची सविस्तर माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन दिली आहे. त्यांनी १५ हजारापेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

१५ हजारहून कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 24 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाणार असल्याची मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. 15 हजारहून कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा EPFO सरकारद्वारे भरला जाणार असल्याची घोषणा सीतारमन यांनी केली आहे.
MSME ला 3 लाख कोटी विना हमी कर्ज मिळेल. तसंच मध्यम, लघूद्योग आणि कुटीर उद्योगांसाठी विशेष योजना त्यांनी सांगितली. या सर्वांना 3 लाख कोटींचं कर्ज दिलं जाईल. तसंच एक वर्ष कर्जाचा हप्ता भरण्याची गरज नाही, असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post