डोकेदुखीने हैराण आहात ?माय अहमदनगर वेब टीम
डोकेदुखी असा त्रास आहे ना की कमी प्रमाणात असली तरी डोकेदुखीमुळे व्यक्ती अस्वस्थ होते. आपल्यापैकीही अनेक जण डोकेदुखीने त्रासले असतील. डोकेदुखीची अनेक कारणे असतात. काही वेळा साधीशी डोकेदुखी मारग्रेनच्या रूपातही भेडसावते तर काहींना तणाव किंवा कसलासा दबाव आल्राने सुरू होते. सतत डोके दुखत असल्याने वैतागलेले आपण वेदनाशामक गोळ्यांचे सेवन करतो. डोकेदुखी थांबतेही. परंतू डोकेदुखीत सातत्याने वेदनाशामक गोळ्या घेणे हे इतर शारिरीक आजार निर्माण करण्राचे कारण ठरू शकतात. त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम न होता डोकेदुखीवर उपचार करणे गरजेचे असते. असे कोणते उपार आपण घरच्या घरी करून डोकेदुखीला पळवून लावू शकतो ते पाहू.

तुळस :                                                                                                                                                                     तुळशीचे एक किंवा दोन थेंब तेल आणि एक किंवा दोन चमचे इतर कुठलेही तेल घ्यावे. तुळशीचे तेल दुसर्‍या तेलाबरोबर मिसळावे. एकत्र केल्यानंतर तेलामध्रे बोटे बुडवून किंवा कापसाने तेल कपाळ आणि मानेवर लावून हलक्या हाताने मालिश करावी. त्यानंतर काही तास तसेच सोडून द्यावे. त्यामुळे डोकेदुखीत आराम मिळतो आहे. खूप जास्त डोकेदुखी होत असेल तर दर काही तासांनी तेल डोक्याला लावू शकता. हे तेल स्नारूंमधील तणाव आणि आखडलेले स्नारू मोकळे करते. वेदना होत असलेल्या जागी लावल्यास बर्‍यापैकी आराम मिळतो. तेलाचे अँटीमारक्रोबिअल गुण डोकेदुखीमध्ये आराम देतात.

थंड-गरम शेक :
खूप जास्त थंड किंवा उष्ण हवामान असेल तर डोकेदुखी सुरू होते. अशा वेळी डोकेदुखीवर वेदनाशामक गोळी घेण्रापेक्षा डोकेदुखीवर काही घरगुती उपार करू शकतो. शेकणे हा देखील प्रभावी घरगुती उपचार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात डोकेदुखीने त्रस्त असाल तर बर्फाचे तुकडे आईस बॅग मध्ये भरून डोके, मान आणि पाठ त्याने दहा ते पंधरा मिनिटे प्रत्येकाला शेकावे. आईस बॅग नसेल तर बर्फाचे तुकडे एखाद्या कापडात बांधूनही वेदना होत असलेल्रा जागी शेकू शकतो. थंडीच्या दिवसात मात्र पाणी कोमट करून ते गरम पाण्याच्या पिशवीत टाकून शेक घेऊ शकता.

आले :
आल्याचे चार लहान लहान तुकडे, तीन कप पाणी एवढे साहित्य घ्या. एका पातेल्यास तीन कप पाणी गेऊन ते चांगले उकळवा. त्रात आल्याचे तुकडे खिसून घालावेत. आता पाणी चांगले उकळून मग बंद करू झाकून ठेवा. मिश्रण थोडे गार झाल्यावर ते गाळून गरम गरम प्यावे. दिवसातून एक किंवा दोन कप एवढे रा मिश्रण सेवन करावे. आल्यामुळे डोकेदुखी कमी होते तसेच मारग्रेनचा त्रास असणार्‍या व्यक्तींना आल्याचे पाणी अधिक फारदेशीर ठरते. मळमळल्यासारखे होत असेल तरीही आल्याचे पाणी उपरोगी पडते. हा घरगुती सोपा उपार बर्‍याचदा डोकेदुखी थांबवण्यासाठी मदत करतो.

पुदीन्याचे तेल :
डोकेदुखीमध्ये पुदीना देखील खूप आराम देतो. एक किंवा दोन थेंब पुदीन्याचे तेल, एक चमचा ऑलिव्ह किंवा नारळाचे तेल घ्यावे. ही दोन्ही तेले मिसळावीत. त्राने आपल्या डोक्याला मालिश करावी. वेदना खूप जास्त असतील तर दर थोडा वेळाने रा तेलाने मालिश करावी त्यामुळे डोकेदुखीत आराम मिळतो. मेंदूमध्ये रक्ताभिसरण वाढवून स्नारूंचे आकुंचन होण्यापासून रोखते. तणावामुळे होणार्‍या डोकेदुखीमध्ये फायदा होतो.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post