कर्करोग पुन्हा का उलटतो ?


माय अहमदनगर वेब टीम
कर्करोग हा जगभरात काही प्रमाणात असाध्य मानला जाणारा आजार आहे. जगभरातच कर्करोगाच्या रूग्णांची संख्या वाढते आहे. विकसनशील देशांमध्ये हृदयरोगानंतर कर्करोग हा मृत्युचे दुसरे महत्त्वाचे कारण आहे. आपल्याकडे कर्करोगावर पुढील पद्धतीनेच उपचार केले जातात. शस्त्रक्रिया, रेडिओथेरेपी आणि किमोथेरेपी. शस्त्रक्रियेने आजाराची गाठ किंवा आजारग्रस्त अवयव काढून टाकला जातो. शस्त्रक्रियेनंतर रेडिओथेरेपी आणि किमोथेरेपी ने विविध प्रकारच्या कर्करोगांमध्ये चांगले परिणाम दिसून येण्यास मदत होते.

संशोधनाच्या मदतीने नव्या किमोथेराप्युटिक एजंटस आणि रेडिएशन ची नवी तंत्रे देखील उपलब्ध झाली आहेत. तरीही काही कर्करोग मात्र पुन्हा उफाळून येतात आणि त्यांचा प्रसार इतर अवयवांमध्ये होऊ लागतो. कर्करोगांच्या पेशींच्या समूहाला कर्करोगाच्या स्टेम सेल्स किंवा स्टेम पेशी म्हणतात. अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की कर्करोगाच्या स्टेम सेल्समुळेच कर्करोगाला प्रतिकार केला जातो आणि कर्करोग पुन्हा होतो. सर्वात पहिल्यांदा 1997 मध्ये ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगाच्या रूग्णामध्ये ट्यूमर इनिशिएटिंग सेल्स ची माहिती नोंदली गेली. त्यानंतर अनेक संशोधने झाली आहेत. याविषयी अगदी थेट स्पष्टपणे माहिती देता येत नाही आणि अनेक विवादही या संदर्भात होतात.

ल्युकेमियाव्यतिरिक्त या पेशी फुफ्फुसे, पॅनक्रिया, यकृत, आतडे, स्तन, मेंदू आणि ओव्हरी या कर्करोगांमध्येही आढळून येतात. कर्करोगाच्या उपचाराचा भाग असलेली किमोथेरेपी आणि रेडीयोथेरेपी यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांमुळे कर्करोगाच्या स्टेमसेल्सचा प्रोत्साहन मिळते. परंतू या दोन्ही उपचार पद्धती कर्करोगासाठी प्रभावी आणि गरजेच्या आहेत. आजार बरा करताना निर्माण होणार्‍या पेशीच उपचार अफसल होण्यासाठी, कर्करोग पुन्हा होण्यासाठी आणि इतर अवयवांपर्यंत त्याचा प्रसार होण्यास कारण ठरतात. कर्करोगाच्या या स्टेम सेल्सला ओळखण्यासाठी पेशींच्या पृष्ठभागावर निर्माण होणारे चिन्ह आणि त्यातून निर्माण होणार्‍या प्रथिनांचा अभ्यास करावा लागतो. या पेशींची निर्मिती होऊ नये म्हणून गेल्या काही काळांपासून उपचारात अनेक प्रकारचे बदल केले जातात.

पारंपरिक थेरेपीबरोबरच इतरही काही थेरेपी किंवा उपचार पद्धतींचा वापर केला जात आहे, ज्यामध्ये कर्करोगाच्या पेशी एखाद्या विशिष्ट भागापुरत्याच रोखून ठेवल्या जातात. त्याव्यतिरिक्त इम्युनोथेरेपी हा मार्गही उपचार पद्धतीत वापरला जातो. कर्करोगाच्या पेशी संपवण्यासाठी शरीरात सायटोकाईन्स निर्माण होते. क्युमिन मुळे सायटोकाईन्सचे पातळी कमी ठेवण्यास मदत मिळते. सायकोटाईन्समुळे कर्करोगाच्या स्टेम सेल्स निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळत असते. त्याचबरोबर कर्करोगग्रस्त पेशी अधिक प्रमाणात करक्युमिन ग्रहण करतात. त्यामुळे या पेशी वेगाने मरतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post