आम्ही पण बोंब मारायची का ? मुख्यमंत्री ठाकरेमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.होळीनंतर कोरोनाची बोंबाबोंद सुरू झाली. ही परिस्थिती अनपेक्षित आणि कोणाच्याही ध्यानी मनी नसलेली आहे.सर्व सण समारंभ आपण घरीच साजरे केले, मुस्लीम बांधव सहकार्य करत आहेतच, ईदही कुठे गर्दी न करता, रस्त्यावर न येता घरी प्रार्थना करुन साजरी करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?
मार्च-एप्रिलपासून कोरोना संकट सुरु झाले. आता अचानक या रुग्णांची संख्या वाढली. मी आपल्याला याबाबत अगोदरच कल्पना दिलेली आहे. हा विषाणू गुणाकार करत जातो. या गुणाकाराला मर्यादा नाही. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण वाढले, कोरोनासोबत जगायला शिका, हे मी सांगतो आहे, शिंकताना काळजी घ्या वगैरे उपाय करावे लागतील. आता गुणाकार जीवघेणा होणार, केसेस वाढणार आहेत.बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स, गोरेगाव येथे फिल्ड हॉस्पिटल सुरु केली आहेत. आपल्याकडे जवळपास 7 हजार बेड्स उपलब्ध आहेत. पुढच्या महिन्यात 13 ते 14 हजार बेड्स उपलब्ध राहतील.

आगामी काळात राज्यावर पावसाचं संकट येणार आहे. त्याकाळात आपल्याला आणखी खबरदारी घ्यावी लागणार आहे. सर्दी, खोकल्यापेक्षा ताप, थकवा, चव जाणे ही कोरोनाची लक्षणे आहेत. थोडी लक्षणे जरी दिसली तरी डॉक्टरांना नक्की दाखवा. इतर आजारांपासून लांब राहणे म्हणजे कोरोना टाळणे. वेळेत दाखल झालेल्यांवर वेळेत उपचार झाले. अतिशय शेवटच्या टप्प्यात आल्याने अनेक मृत्यू झाले.

लाखो-कोटींची अनेक पॅकेज येतात. फक्त पॅकेज देऊन भागणार नाही. त्यापेक्षा प्रभावी उपाययोजनांची राज्याला गरज आहे. महाविकास आघाडी अशा पोकळ घोषणा करणार नाही. प्रत्यक्षात काम करेल. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला.


पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याची गरज
आगामी काळात राज्यावर पावसाचं संकट येणार आहे. त्याकाळात आपल्याला आणखी खबरदारी घ्यावी लागणार आहे. सर्दी, खोकल्यापेक्षा ताप, थकवा, चव जाणे ही कोरोनाची लक्षणे आहेत. थोडी लक्षणे जरी दिसली तरी डॉक्टरांना नक्की दाखवा. इतर आजारांपासून लांब राहणे म्हणजे कोरोना टाळणे. वेळेत दाखल झालेल्यांवर वेळेत उपचार झाले. अतिशय शेवटच्या टप्प्यात आल्याने अनेक मृत्यू झाले.

केंद्र सरकारने लाखो कोटींची पॅकेज वाटली. पण हाती काय आलं?
विरोधक पॅकेज का नाही दिलं? असा प्रश्न विचारतात. केंद्र सरकारने लाखो कोटींची पॅकेज वाटली. पण हाती काय आलं?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. “आरोग्य सुविधा निर्माण करणे, अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाचं आहे. सर्व वर्गासाठी मदत केली पाहिजेअसेमुख्यमंत्री म्हणाले.

पॅकेज घोषित कशाला करत बसायचं, थेट मदत केली
राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी 481 ट्रेन सोडल्या. त्याने सहा ते सात लाख मजूर गावी गेले. यामध्ये 85 कोटी रुपये खर्च झाले. महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत शंभर टक्के जणांना मदत झाली. पॅकेज घोषित कशाला करत बसायचं, थेट मदत केली.3 लाख 80 हजार नागरिकांना एसटीने आपापल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवलं. यामध्ये 75 कोटी रुपये खर्च झाले”, असेउद्धव ठाकरे म्हणाले.

केंद्राकडून जीएसटीचा पैसा आलानाही, आम्ही पण बोंब मारायची का?
कोणीही राजकारण करू नये. तुम्ही केले तरी आम्ही करणार नाही. कारण आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. तुम्ही काही म्हणा, मात्र मी आणि माझे मंत्रिमंडळ आणि सरकार प्रामाणिकपणाने काम करत आहे. केंद्र सरकार मदत करत आहे, पण काही प्रमाणात उणीवा भासत आहेत. जीएसटीचे पैसे येणे बाकी आहे. रेल्वेचे पैसे अजुन आले नाही. यावर आम्ही बोंब मारावी का?

असा उघडणार लॉकडाउन
लॉकडाउन राहणार की उठणार हा हो किंवा नाही चा प्रश्न नाही. हळूहळून एक एक गोष्टी बंद करत गेलो. कोरोनाचा व्हायरस गुणाकार करत आहे. येत्या काळात अनेक केसेस वाढणार आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काळजी करू नये. त्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत. लॉकडाउन अचानक उठवणे चांगली बाब नाही. आपण हळूहळू आपल्या आयुष्याची गाडी पूर्वपदावर आणत आहोत. एक एक गोष्टी हळू हळू सुरू करणार आहोत. असे असले तरी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मास्क वापरा, हात स्वच्छ धुवत राहा. सॅनेटायझरचा वापर करणे. सरकारने शिथिलता दिल्यास काळजी घ्यावी लागणार. गर्दी झाल्यास पुन्हा लॉकडाउन वाढवण्यात येईल.

कोरोनाकडे थोडंस पॉझिटिव्ह पाहा. कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलं आहे. जगयाचं कसं, स्वच्छता कशी राखायची, एकमेकांपासून अंतर कसे पाळायचे अशा गोष्टी आपल्याला कोरोनाने शिकवले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post