नागठाणा येथील मठाधिपती, सेवेकऱ्याची हत्यामाय अहमदनगर वेब टीम
नांदेड - पालघर येथील दोन साधूंची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्येउमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची रात्री दीड वाजताच्या दरम्यान निर्घृण हत्या करण्यात आली. गावातीलच एका माथेफिरूने खून केल्याचा आरोप आहे.


प्राप्त प्राथमिकमाहितीनुसार,गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला, आणि त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली. महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने गाडी न घेताचपळ काढला.
ज्या मठात शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला, त्याच मठातील बाथरूममध्ये आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. भगवान शिंदे रा.चिंचाळा ता. उमरी असे मृताचे नाव असल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी उमरी पोलिस रवाना झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. महाराजांचे मृतदेह उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला. आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही, असा पवित्रा भाविकांनी घेतला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post