राज्यत १६७१ पोलिसांना ‘कोरोना’ची बाधा, तर १८ पोलिसांचा मृत्यू
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई – महाराष्ट्रातल्या १६७१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये १७४ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर १४९७ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर १८ पोलिसांचा आत्तापर्यंत कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ५४१ पोलीस हे कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी यासंदर्भातली माहिती दिली असून एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
२१ मे रोजी ठाण्यात ४५ वर्षीय महिला पोलिसाचा कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. तर पुण्यातही दोन पोलिसांच्या दोन मृत्यूची नोंद झाली होती.
पोलिसांचा आणि डॉक्टरांचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायमच कोरोना योद्धे म्हणून केला आहे. तसेच आत्तापर्यंत जवळपास सगळ्याच राजकीय नेत्यांनी पोलिसांचे वारंवार आभार मानले आहेत.
Post a Comment