परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत करा ः रेशमा आठरे


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : उच्च माध्यमिक शैक्षणिक वर्गाच्या अंतिम वर्षाचे सत्र सोडून इतर सर्व वर्गाच्या परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तरी महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क दिलेले आहे. तरी विद्यार्थ्यांनी जमा केलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळावे अथवा पुढील शैक्षणिक वर्षाच्या फीमध्ये समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्याकडे शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने अध्यक्षा रेशमा आठरे यांनी केली.

कोरोना संसर्ग विषाणूमुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी गोरगरीब कुटुंब व शेतकरी वर्गातून आहेत. तरी सरकारने सर्व विद्यार्थ्यांची फी परत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post