शहरातील व्यावसायिकांना परवानगी देण्यात यावी ः आ. संग्राम जगताप


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. आज सुमारे 50 दिवस झाले आहे. त्यामुळे नगर शहरातील छोटे मोठे व्यावसाय बंद आहेत. या व्यवसायावर अनेक कुटुंब तसेच नोकरदार वर्ग अवलंबून आहे. आज यांच्यावर संकट आले आहे. तरी नगर शहरातील व्यवसाय सुरु करण्यासाठी कोरोना संदर्भातील अटीशर्तीचे पालन करुन टप्याटप्याने महापालिकेने परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आयुक्त श्रीकांत मायकलार यांच्या आ.संग्राम जगताप यांनी केली.

नगर शहरातील व्यावसायिकांना टप्याटप्याने परवानगी देण्याची मागणी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या आ. संग्राम जगताप यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, कुमारसिंग वाकळे, अजिंक्य बोरकर डॉ. सागर बोरुडे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, संजय ढोणे, सतीश शिंदे आदी उपस्थित होते.

आ. जगताप पुढे म्हणाले की, नगर शहरातील व्यावसायिक कोरोना संदर्भातील अटीशर्तीचे नक्की पालन करतील. ते मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पालन करतील. व्यवसाय सुरु झाल्यास सर्वसाधारण व्यक्तीस या संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल. तरी लवकरात लवकर या व्यावसायिकांना अटीशर्तींचे पालन करुन परवानगी देण्यात यावी, असे ते म्हणाले. यावेळी शहरातील कोरोना संदर्भातील माहिती आयुक्त यांच्याकडून घेतली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post