आता सावेडी उपनगर विकासाला मिळणार गती - आ. संग्राम जगताप


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - गेली 45 वर्षांपासून सावेडी परिसराचे तपोवन रस्त्याचे स्वप्न अखेर मार्गी लागणार आहे. या रस्त्याच्या कामात विरोधकांनी अनेक अडचणी आणल्या मात्र गेली पाच वर्षांपासून केलेल्या जोरदार पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या रस्त्याचे मजबुती करणाचे काम पूर्ण झाले असून डांबरीकरणाचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत या रस्त्याचे काम पूर्ण होईल. या रस्त्याच्या माध्यमातून सावेडी उपनगराच्या विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम आता सुरू झाले आहे. या कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. याप्रसंगी महापालिकेतील विरोधीपक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरूडे, सुनील त्र्यंबके, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण, सतीश बारस्कर, योगेश ठुबे, रावसाहेब बारस्कर, देवीदास बारस्कर, तुकाराम बारस्कर, सतीश ढवण, स्वप्नील ढवण, विकास ढवण, विलास ढवण, अशोक ढवण, किसन कसबे, रामदास ढवण, राजू तागड, संकेत शिंगटे, साहेबराव कसबे, अनिल देवकर, विठ्ठल खेंडके, तुषार यादव आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले, गेल्या पंचवार्षिकमध्ये राज्य शासनाकडे या रस्त्याचे काम मार्गी लागण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. या रस्त्याचे काम होऊ नये यासाठी विरोधकांनी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केले होते. या अडचणी दूर करत या रस्त्याचे काम सुरू होत आहे. हा रस्ता उपनगरातील मोठी बाजारपेठ होऊ शकते. नगर-मनमाड व नगर-औरंगाबाद रस्त्यांना जोडणारा हा रस्ता बाह्यवळण रस्ता व पाईपलाईन रस्त्याला मोठा पर्याय ठरेल, असा विश्‍वास आमदार जगताप यांनी व्यक्‍त केला.

संपत बारस्कर म्हणाले,

सावेडी उपनगराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा असलेल्या तपोवन रस्त्याचे काम आमदार संग्राम जगताप यांच्या अथक प्रयत्नांतून मार्गी लागले आहे. या तपोवन रस्त्याच्या दुतर्फा आम्ही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणार असून हा रस्ता नगर शहरातील पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक असलेला एक रोल मॉडेल असा रस्ता ठरेल. या लॉकडाउनच्या काळातही आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभागात तसेच शहरातही विविध विकास कामे चालू आहेत.

सावेडी उपनगराचा रखडलेला विकास गेली पाच वर्षांत आमदार संग्राम जगताप यांनी खऱ्या अर्थाने प्रयत्नाने चालना मिळाली आहे. भिस्तबाग महाल ते प्रोफेसर कॉलनी चौक या रस्त्यासाठीही आमदार जगताप यांनी मोठा निधी आणलेला आहे. या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.

निखील वारे म्हणाले, तपोवन रस्त्याच्या कामासाठी आमदार जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी या रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. या कामासाठी अडचणी होत्या. आमदार जगताप यांनी त्या सोडविल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post