मटका किंग खत्री यांचं निधन


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : मटका किंग रतन खत्री यांचं निधन झालं आहे. मुंबईत शनिवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते 88 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. रतन खत्री मुंबई सेंट्रलमधील नवजीवन सोसायटीत आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. शनिवारी सकाळी खत्री यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सट्टा आणि मटका क्षेत्रातल्या लोकांना दु:ख अनावर झालं आहे. 1960च्या काळात त्यांनी कल्याण भगत यांच्यासोबत मुंबईत मटक्याचा धंदा सुरू केला होता. खत्री भगत यांच्या धंद्यात मॅनेजर म्हणून रुजू झाले होते. 1964मध्ये खत्री यांनी भगतपासून वेगळे होऊन स्वत: चा रतन मटका धंदा सुरू केला.

पाहता पाहता त्यांचा धंदा एवढा लोकप्रिय झाला की, त्यांना मटका किंगच लोक म्हणू लागले. गेल्या अनेक दशकांपासून आजमितीस मटका हे अनेकांच्या आवडीचं व्यसन आहे. खत्री यांच्या जाण्याने सट्टा किंवा मटका क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मटका किंवा एका भांड्यात चिट्सवरून चिठ्ठी काढण्यामुळे ते प्रसिद्ध झाले. त्या काळात जुगाराची उलाढाल दररोज 1 कोटी रुपयांच्या घरात होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post