उमरगांवमध्ये अडकले 'राधाकृष्ण'चे मुख्य कलाकार, 180 क्रू मेंबर्स आहेत सोबत
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई-  कोरोनाव्हायरसचा परिणामजगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनावरच नव्हे तर सर्व उद्योगांवर झाला आहे. विशेषत: एंटरटेन्मेंट इंडस्ट्री अडचणीत आली आहे. आऊटडोअर शूटवर गेलेल्या ब-याच टीमही बाहेर अडकल्या आहेत. यात स्टार इंडियाची मालिका 'राधाकृष्ण'मधील कलाकार आणि 180 क्रू मेंबर्स उमरगांवमध्ये अडकले आहे.
सेटवर मल्लिका सिंगची आईही हजर आहे
वृत्तानुसार, 'राधाकृष्ण' या मालिकेतील मुख्य कलाकार सुमेध मुगदळकर, मल्लिका सिंह, निमाई बाली आणि सुमारे 180 क्रू मेंबर्स महाराष्ट्र सीमेवरील उमरगांव येथे शूटिंग करत होते. याच काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि संपूर्ण टीम तिथेच अडकली. असे म्हटले जाते की, प्रॉडक्शन हाऊसने सर्वांसाठीआवश्यक सोयसुविधांचीव्यवस्था केली आहे. शोमध्ये राधाची भूमिका साकारणारी मल्लिका सिंगची आईसुद्धा तिथेच त्यांच्यासोबत राहत आहे.
आम्ही येथे महिनाभरापासून आहोत: मल्लिका
एका बातचीतमध्ये मल्लिका म्हणाली, "यावेळी परिस्थितीवेगळीआहे. आम्हाला वाटले की, काही दिवसांत लॉकडाऊन हटविले जाईल. सुरक्षेसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही येथे महिनाभरापासून आहोत. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. स्वस्तिक प्रॉडक्शन्सने (शोचे प्रॉडक्शन हाऊस) उमरगांवमध्येसर्व कलाकारांना राहण्यासाठीफ्लॅट दिला आहे. आम्ही येथे ठिक आहोत. येथे सर्व प्रकारच्या खाण्यापिण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रॉडक्शन हाऊस आमची काळजी घेत आहे. दर तिस-या चौथ्या दिवशी डॉक्टर येतात आणि आमच्या शरीराचे तापमान चेक केले जाते. संपूर्ण शूटिंग लोकेशन आणि आमची इमारत सॅनिटाइज केलीगेलीआहे."
एका कामामुळे थांबला होता सुमेध 
सुमेध एका बातचीतमध्ये म्हणाला, "मला काही कामासाठी येथे थांबावे लागले होते. मला लॉकडाऊन होईल हे माहित नव्हते. आता परिस्थिती अशी आहे की लॉकडाऊन 2 सुरु झाले आहे. यावेळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सुरक्षित आहोत. माझ्याशिवाय इथे बरेच लोक आहेत. आम्ही सर्वजण
वेगवेगळे राहात आहोत."

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post