संसर्गाच्या धोक्यापासून बचावामध्ये भारत चीनच्याही पुढे! कोरोना विषाणूवर फोर्ब्जमध्ये दावा
माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन - कोरोना महामारीमुळे जगभरात उलथापालथ होत आहे. दीड लाखाहून जास्त लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. लोक आपले आरोग्य व आर्थिक चिंतेत दिसून येत आहेत. प्रत्येक देश कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपल्या पातळीवर प्रयत्न करताना दिसतो. हाँगकाँगमधील डीप नॉलेज ग्रुपने सुमारे २०० देशांचे विश्लेषण करून सुरक्षा उपचार, सरकारी व्यवस्थापन, आरोग्य सेवा इत्यादी ७६ निकषांवर कोणत्या देशात कशी स्थिती आहे, याची श्रेणी तयार केली आहे. सुरक्षेच्या पातळीवर इस्रायल अव्वल आहे. जर्मनी दुसऱ्या, दक्षिण कोरिया तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर आहेत. चीन पाचव्या क्रमांकावर आहे. भारताचा विचार केल्यास भारत टॉप-४० मध्येही सहभागी नाही. संसर्गाची जोखीम हाताळण्यात चीनपेक्षा चांगली स्थिती व २० देशांत १५ व्या क्रमांकावर आहे.

अशी केली उपाययोजना
- वेगवान व प्रभावी उपाय केले. बाधितांची संख्या ५० हजारांवर जाण्यापूर्वीच क्वाॅरंटाइन,
- लॉकडाऊनसारख्या उपाययोजना लागू करत संसर्ग रोखला.

शेजाऱ्यांपेक्षा सतर्क
संसर्ग पसरण्याची जोखीम, सरकारी व्यवस्थापन, आरोग्यसेवेची कार्यक्षमता आणि विशेष क्षेत्रात काळजी बाळगण्याबाबत भारताची कामगिरी शेजारी राष्ट्रांपेक्षा चांगली आहे. टॉप-२० देशांमध्ये आपण १५ व्या स्थानी आहोत. चीन आणि पाकिस्तानचा यात समावेश आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यापेक्षा पुढे आहे. टॉप-५ मध्ये ४ युरोपीय देश आहेत.

आशियातील सात देशांचा समावेश
संसर्गाच्या जोखमीच्या संकटाचा सामना करणाऱ्या आघाडीच्या २० देशांतील १० नंतर आशिया देशांचा समावेश आहे. १० देशांत भारत, श्रीलंका, बांगलादेशसह सात देश आशियातील आहे. त्यात नायजेरिया (११), रशिया (१२), बांगालदेश (१३), मेक्सिको (१४), भारत (१५), श्रीलंका (१६), इंडोनेशिया (१७), म्यानमार (१८), कंबोडिया (१९), लाआेस (२०) चा समावेश आहे.

जपानपेक्षा ऑस्ट्रिया उत्कृष्ट
उपचार क्षमतेच्या श्रेणीचा अभ्यास निगराणी किती चांगल्या प्रकारे केली जात आहे ? नागरिकांना कशाप्रकारे माहिती दिली जात आहे? यावर आधारित ही माहिती अवलंबून आहे. उपचारातील वेग, तपासणी, लस संशोधनाची स्थिती यांचाही आढावा घेतला. त्यात जपानपेक्षा ऑस्ट्रियाची स्थिती चांगली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post