चीनची जागतिक आरोग्य संघटनेला ३ कोटी डॉलर्सची मदत !
माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली – काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिला जाणारा निधी रोखणार असल्याचे स्पष्ट केले होते, त्यातच आता चीनने जागतिक आरोग्य संघटनेला मदत करण्याची घोषणा केली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संघटनेला 3 कोटी डॉलर्स देण्याची घोषणा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी केली आहे.
चीनने याआधी देखील 2 कोटी डॉलर्स ची मदत केली आहे. करोनाविरुधच्या जागतिक युद्धात मदत करणे व विकसनशील देशांची आरोग्य व्यवस्था मजबूत करणे हा त्या मागचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Post a Comment